करमाळा प्रतिनिधी
आज केत्तुर ग्रामपंचायती समोर केत्तुर व परिसरातील नागरिकांनी पारेवाडी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्यांचे थांब्या बाबत व गेट नं. २८ मधील रस्त्याचे प्रलंबित कामांबाबत मिटींग आयोजित करण्यात आली होती. यावेळी बहुसंख्य नागरिक,
व्यापारी, युवक मंडळीची उपस्थिती होती. आज मिटींग मधे झालेल्या निर्णया प्रमाणे पारेवाडी रेल्वे स्थानकावर दिनांक २४ फेब्रुवारी रोजी रेलरोको करण्याबाबत ठरले असुन, त्या बाबत लवकरच निवेदन देण्यात येणार आहे. सदर बैठकीचे वेळी समस्त
ग्रामस्थांनी अतिशय जळजळीत प्रतिक्रीया दिलेल्या असुन, १९९६ साली याच प्रश्नावर रेल रोको झाला, पुढे दर वर्षी रेल्वे विभागाला अर्ज दिले परंतु मागणीचा विचार झालेला नसलेचे सांगितले. पारेवाडी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस थांब्याचा विषय
महत्वाचा असुन, या भागातील वृद्ध नागरिक, शालेय विद्यार्थी, नोकरदार, प्रवासी बंधु भगिनींना रात्री अपरात्री चा बायरोड ६० किमी अपडाऊन प्रवास करावा लागतोय. त्यामुळे मागणी रास्त असुनही प्रवासी बांधवांचे मागणीचा विचार होताना दिसत
नाही. रेल्वे मंत्रालया कडे विविध माध्यमातुन मागणी होऊनही, तसेच विदयमान खासदारांना निवेदन देऊनही थांब्या बाबत चे आश्वासन अजुनही पुर्ण झालेले नाही त्यामुळे केत्तुर, पारेवाडी सह आसपासचे दहा गावांनी मतदान करण्यावर बहिस्कार घालणे बाबतचा ठराव संमत करणेचे ठरले आहे. रेल रोको आणि बहिष्कार टाकण्याचे मुद्द्यावर ग्रामस्थ ठाम असुन रेल्वे मंत्रालयाकडुन लवकरात लवकर निर्णय होणे अपेक्षित आहे.