शहर कार्याध्यक्षपदी कारंडे यांची निवड
करमाळा प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या करमाळा शहर कार्याध्यक्षपदी रंभापूरा येथील श्रीराम (रामा)सुंदर कारंडे यांची आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्र देऊन निवड केली आहे.
यावेळी आमदार संजयमामा शिंदे,
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आजची निवड करण्यात आली.
करमाळा तालुक्याचे आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या विचाराने या पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रामाणिक पणे काम करणार असल्याचे कार्याध्यक्ष यांनी सांगितले. आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरीष्ठ नेते मंडळी पदाधिकारी उपस्थित होते.