राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्ष पदी सोहेल पठाण
करमाळा प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ( अजित पवार गट ) करमाळा शहर अध्यक्षपदी सोहेल कादर पठाण यांची निवड झाल्याबद्दल सकल मुस्लिम समाज . रेनुमा चॅरिटेबल संस्था. ए पी .जी.अब्दुल कलाम फाउंडेशन यांच्याकडून सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले यावेळी सत्काराला उत्तर देताना पठाण म्हणाले की करमाळा शहरातील मुस्लीम समाजातील असणारे विविध प्रश्न व समाजातील विविध लोकांची असणारे अडचणी सोडविण्यासाठी मा. अजित दादा पवार ( उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ) व लोकप्रिय आमदार संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून
मुस्लीम समाजातील सर्व युवक व जेष्ठ मंडळींना सोबत घेऊन एकत्र करून मुस्लीम समाजातील प्रश्न सोडविणार आहे असे नवनियुक्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष मा. सोहेल भाई पठाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी जेष्ठ नेते फारुख भाई जमादार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की मा अजित दादा पवार यांनी अल्पसंख्याक समाजातील युवकांस संधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत.
यावेळी सकल मुस्लीम समाजातील ज्येष्ठ नेते फारुख भाई जमादार, जेष्ठ पत्रकार पुढारी चे व माजी नगरसेवक अशपाक भाई सय्यद, राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष आझाद भाई शेख, जामा मस्जिद चे विश्वस्त अध्यक्ष जमीर भाई सय्यद, रहेनुमा चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव सुरज भाई शेख, ए.पी. जे अब्दुल कलाम फाऊंडेशन चे सचिव रमजान भाई बेग, सामाजिक कार्यकर्ते मुस्तकीम भाई पठाण, रहेनुमा चॅरिटेबल ट्रस्ट चे सल्ला गार इम्तियाज भाई पठाण व सर्व समाजातील युवक उपस्थित होते.