उस वाहतूकदारांची फसवणूक करणाऱ्या टोळी मुकादमांचा तपास करण्यासाठी विशेष पोलीस पथक तयार करा- युवासेनेची मागणी
करमाळा दि ०९ (प्रतिनीधी)
उस वाहतूकदारांची फसवणूक करणाऱ्या टोळी मुकादमांचा तपास करण्यासाठी विशेष पोलीस पथक तयार कर या मागणीचे निवेदन
युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह उस वाहतूकदारांचे शिष्टमंडळ घेऊन पोलीस निरीक्षक यांना विनोद घुगे यांना निवेदन सादर केले
या वेळेस शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे, शहरप्रमुख संजय शिंदे, उपशहरप्रमुख संतोष गानबोटे, युवासेना शहरप्रमुख, समिर हालवाई, युवासेना समन्वयक प्रसाद निंबाळकर उपशहरप्रमुख कल्पेश राक्षे, शिवाजी नाईनवरे, राजेंद्र गव्हाणे, विभाग प्रमुख सोमनाथ पोळ आदी उपस्थित होते.
यावेळेस युवासेना तालुकाप्रमुख शंभू फरतडे म्हणाले कि ४ डिसेंबर रोजी युवासेनेकडुन या मुद्द्यावर घंटानाद आंदोलन झाल्यानंतर जवळपास चाळीस गुन्हे दाखल झाले आहेत मात्र याचा सखोल तपास करून फसवणूक करणारे मुकादम टोळीतील आरोपी यांच्या मुसक्या आवळल्या तरच न्याय भेटेल, जोपर्यंत हि कारवाई होत नाही तोपर्यंत लढा सुरू राहिल असे शंभू फरतडे यांनी सांगीतले,
पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून शक्य तेवढा जलद तापास करून तसेच आणखी कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांचे देखील गुन्हे दाखल करून घेतले जातील असे आश्वासन दिले
निवेदनाची प्रत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, पोलीस अधीक्षक, उपाधीक्षक यांना देण्यात आली आहे या वेळेस बहुसंख्य उसवाहतुकदार, शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.
चौकट
पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी तहसील परिसरातील बेशिस्त मोटारसायकल पार्कींग बंद केले, अवैध धंदे बंद केले आहेत त्याबद्दल शिवसेनेकडून पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचा सत्कार करण्यात आला तसेच यापुढे देखील अवैध धंदे बंद ठेवावे व करमाळा तालुक्यात शांताता आबाधित ठेवावी अशी अपेक्षा वक्त केली