संघर्ष केला तर यश नक्कीच मिळते – प्रा. गणेश करे-पाटील
कंदर ता करमाळा येथे डॉ.ए. पी.जे. अब्दुल कलाम वाचनालय व अभ्यासिकाच्या उदघाटन
प्रतिनिधी | कंदर
गावातील युवकांनी एकत्रित येऊन वाचनालय व अभ्यासिका सुरू केली हे कौतुकास्पद आहे.संघर्ष केला तर यश नक्कीच मिळते
असे प्रतिपादन यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांनी केले.
कंदर ता करमाळा येथे डॉ.ए. पी.जे. अब्दुल कलाम वाचनालय व अभ्यासिकाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना करे-पाटील म्हणाले की,भविष्याला वळण देणारी वाचनालय व अभ्यासिका उपलब्ध झाल्याने याचा अनेकांना फायदा होईल.गावातून अधिकारी निर्माण होतील.त्याग केल्याशिवाय यशाचा मानकरी होत नाही.तसेच वाचनालय साठी लागेल ती मदत देणार असेही ते म्हणाले.
यावेळी गणेश लोकरे, दादा पवार यांची भाषणे झाली.
प्रास्ताविक गणेश जगताप यांनी केले.सूत्रसंचालन शेख यांनी तर आभार सुभाष पवार यांनी मानले.
यावेळी श्रीहरी शिंदे,उपसरपंच अमर भांगे,रणजित लोकरे,विजय रोमन,वैभव पराडे,चैतन्य पाठक,राहुल भांगे यांच्यासह गावातील तरुण व ग्रामस्थ उपस्थित होते.