भाजपचे शहराध्यक्ष पदी जगदीश अग्रवाल यांची निवड
करमाळा प्रतिनिधी
करमाळा भाजपा शहराध्यक्षपदी पुनश्च जगदीश अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्हा अध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांनी आज त्यांच्या शहराध्यक्षपदी निवडीचे पत्र दिले आहे निवडीनंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी मान्यवरांनी अग्रवाल यांचे अभिनंदन केले आहे.तसेच पेढे फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला होता