करमाळा तालुक्यातील रखडलेली पोलीस पाटील भरती प्रक्रिया आचार संहिता अगोदर त्वरित राबवावी- मांढरे- पाटील
करमाळा तालुका पोलीस भरती प्रक्रियेमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करमाळा तालुका अध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील यांनी केली आहे गेली कित्येक वर्ष झाले तालुक्यातील अनेक गावांची पोलीस पाटील पद रिक्त आहेत मागच्या महिन्यामध्ये ती रिक्त पद भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती उमेदवारांची परीक्षा मुलाखती सर्व काही प्रक्रिया पूर्ण झालेली असताना व सोलापूर जिल्ह्यातील बाकीच्या तालुक्यात भरती प्रक्रिया पूर्ण झाली असताना मग करमाळा
तालुक्यातील भरती प्रक्रिया का खोळंबली कुठे माशी शिंकली असा सवाल गावगाड्यातील सामान्य नागरिकांना पडला आहे करमाळा तालुक्यात 118 ते 20 गाव आहेत त्याप्रमाणे पोलीस यंत्रणा कमी पडत आहे तालुक्यातील अनेक पोलीस प्रशासनातील पदे रिक्त आहेत 50 टक्के पेक्षा कमी पोलीस कर्मचाऱ्यावरती तालुक्याचा कारभार चालतो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ती आबादीत राहावी म्हणून कमी पोलीस यंत्रणा असल्याने त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात ताण येत आहे त्यामुळे गाव पातळीवरील पोलीस पाटलांची आवश्यकता आहे ती पदभरन गरजेच आहे पोलीस पाटील हा सामान्य नागरिक व पोलीस प्रशासन यांच्या मधला एक दुवा असतो कायदा सुव्यवस्था अबाधित रावी याबाबतीत देखील त्यांची
भूमिका महत्त्वाची असते सध्या लोकसभा विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून त्या दृष्टीने कायदा सुव्यवस्था राखणं पोलिसांसाठी खूप जिकरीचे आहे अशातच पोलीस पाटलांची भरती प्रक्रिया राबवली तर त्या दृष्टीने त्यांचं खूप मोठं योगदान होऊ शकते व पोलीस प्रशासनाला खूप मोठी मदत होऊ शकते त्यामुळे भरती प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेब गट तालुका अध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील यांनी केली आहे याबाबतीत आपण लवकरच जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले