जेआरडी माझा

नागपूर विधान भवनावर भव्य मोर्चा दिनांक ११ रोजी वार सोमवार वेळ ठीक अकरा वाजता आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मोर्चाला करमाळा तालुक्यातून धनगर समाजामध्ये मोर्चा संदर्भात जनजागृती करण्याकरिता

गावोगावी घोंगडी बैठक संपूर्ण तालुक्यामध्ये घेऊन हजारोच्या संख्येने नागपूरला जाण्याचा निर्धार करमाळा तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी केला आहे, अशी माहिती हिंदुस्तान शिव मल्हार सेनेचे करमाळा तालुका अध्यक्ष अण्णासाहेब

सुपनवर यांनी दिली आहे. करमाळा तालुक्यातील धनगर समाजामध्ये आरक्षण न मिळाल्यामुळे तीव्र संताप आहे. करमाळा तालुक्यातील 118 गावांमध्ये घोंगडी बैठका घेऊन नागपूरला जास्तीत जास्त समाज बांधव जाण्यासाठी जनजागृती करून

समाजामध्ये एकजूट करण्याचा प्रयत्न चालू आहे. एक दिवस जातीसाठी हा संकल्प संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजन हृदय सम्राट क्रांतीसुर्य संघर्ष युद्ध आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. करमाळा तालुक्यामधून धनगर समाजामधून चांगला

प्रतिसाद मिळत आहे. घोंगडी बैठकीला समाज बांधव उपस्थित राहत आहेत. यावेळी रिटेवाडी चे सरपंच दादासाहेब कोकरे, उबरड चे सरपंच संदीप मारकड, ओबीसी विचार मंचाचे तालुका कार्याध्यक्ष विनोद महानवर, हिंदुस्तान शिव मल्हार सेनेचे युवा अध्यक्ष नितीन तरंगे, समाधान मारकड, कल्याण कोकरे, नवनाथ कोळेकर, विजय हुलगे, बालाजी हंडाळ, वैजनाथ तरंगे, चंद्रकांत घरबुडवे, आदि पदाधिकारी परिश्रम घेत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *