जेआरडी माझा
जागतिक बौद्ध धम्म दीक्षा परिषदेसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) सोलापूर जिल्हा ग्रामीण भागातील कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आरपीआयचे तालुका अध्यक्ष जितेश कांबळे यांनी केले आहे.
या पत्राद्वारे सूचित करण्यात येते की, राष्ट्रीय नेते डॉ. रामदासजी आठवले यांच्या आदेशाने व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या सूचनेने आपणास कळविण्यात येते की, दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी मुंबईत महालक्ष्मी रेस कोर्स
मैदान मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्मदीक्षा समारोह समितीतर्फे जागतिक बौद्ध धम्म दीक्षा परिषद आयोजित केली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी राज्य कार्यकारिणी, पश्चिम महाराष्ट्र कार्यकारणी, जिल्हा कार्यकारणी, तालुका
कार्यकारणी, युवक आघाडी कार्यकारणी व सर्व पदाधिकारींची उपस्थित राहणार आहे. तरी मी आपणास तालुकाध्यक्ष या नात्याने आपल्या सर्व बहुजन बांधव, भीमसैनिक, पक्षाचे पदाधिकारी, शहर कार्यकारिणी, सदस्य यांना सुचित करतो की, आपण सर्वांनी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आरपीआयचे तालुका अध्यक्ष जितेश कांबळे यांनी केले आहे.