छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर येथे एल्गार मेळावा – अध्यक्ष प्रशांत शिंदे
करमाळा प्रतिनिधी
समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मेळावा इंदापूर येथे आहे. अशी माहिती समता परिषदेचे करमाळा तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी दिली आहे.
ओबीसींचे नेते योध्दा म्हणून छगनराव भुजबळ यांना संबोधले जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर येथे नवीन नगरपरिषद मैदानासमोर शनिवार दिं 9 रोजी दुपारी एक वाजता एल्गार मेळाव्याचे आयोजन केले आहे. याप्रसंगी अनेक
ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत. यासाठी लाखोच्या संख्येने सर्व ओबीसी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन समता परिषदेचे अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी केले आहे.