करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग करमाळा या कार्यालयामध्ये कार्यरत असणारे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांना मोजमापे घेण्याचा म्हणजेच एमबी लिहिण्याचे अधिकार दिल्यापासून करमाळा तालुक्यातील रस्ता
दुरुस्तीच्या विकास कामांमध्ये होणारा भ्रष्टाचार हा पूर्णपणे वाढल्याचे दिसून येत आहे. काही स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांना एमबी देखील लिहिता येत नाही. त्यांच्या मध्ये तेवढी पात्रता क्षमता नसताना देखील त्यांना एमबी अधिकार
दिले आहेत. त्यांच्या वर वरीष्ठ अधिकारी एवढं मेहरबान का झाले आहेत याची देखील चौकशी झाली पाहिजे सदरील एमबी ही ठेकेदार लिहितात ज्या रस्त्याचे काम ठेकेदार स्वतः करतात त्याच रस्त्याची मोजमापे घेण्याचे काम स्वतः ठेकेदार करतात
त्याच्यामुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला दिसून येत आहे मनमानी पद्धतीने काम कमी मोजमापे मनमानी पद्धतीने घेतली जाता यामध्ये ठराविक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हे ऑन ड्युटी नशेमध्ये असतात त्यांची मेडिकल करा
अशी अधिकारी एमबी कशी लिहू शकतात. हा सर्वसामान्य जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे यांच्यावरती मेहेरबान होणारे अधिकारी ज्यांनी यांना एमबी लिहिण्याचे अधिकार दिलेले आहेत त्यांची चौकशी होऊन स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचे एमबी चे अधिकार काढून घेण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील यांनी केली आहे.