दहिगांव उपसा सिंचन योजनेवरील बंद नलिका वितरण प्रणाली कामांचे भूमिपूजन

करमाळा प्रतिनिधी 

मौजे – साडे – जेऊर रोड लगत मुख्य कालवा येथे आज महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे अंतर्गत दहिगांव उपसा सिंचन योजनेवरील बंद नलिका वितरण प्रणाली कामांचे भूमिपूजन करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे  आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते व करमाळा तालुक्याचे जेष्ठ नेते व माजी आमदार जयवंतराव भाऊ जगताप यांच्या

अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी जेष्ठ नेते वामनदादा बदे, शेलार तात्या, मस्कर तात्या, उद्योजक दशरथ शेठ घाडगे, कल्याण बापू पवार, विलासदादा पाटील, घोटी गावचे सरपंच विलासकाका राऊत, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता साळे, कार्यकारी अभियंता जाधवर, उप अभियंता संजय आवताडे, प्रोजेक्ट मॅनेजर मुजावर, पै.चंद्रहासबापू निमगीरे, माजी

जि.प.सदस्य, उध्दवदादा माळी, वाशिंबे गावचे सरपंच तानाजीबापू झोळ, भरतभाऊ आवताडे, राजेंद्र बारकुंड साहेब, ताकमोगे सर, मांगी गावचे सरपंच सुजीततात्या बागल, राजेंद्र पवार,साडे गावचे सरपंच मयुर पाटील, भोसे गावचे सरपंच भोजराज सुरवसे,  गौंडरे गावचे सरपंच सुभाष हनपुडे, नेरले गावचे सरपंच समाधान दोंड,सौंदे गावचे सरपंच जोतीराम लावंड, कंदर गावचे उपसरपंच अमर भांगे, अर्जूननगर गावचे माजी सरपंच प्रकाश थोरात, मानसिंग खंडागळे, पै.उमेश इंगळे, पै.अनिल फाटके, तसेच दहिगांव उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *