भुईकोट किल्ला स्वच्छ्ता मोहिम

करमाळा प्रतिनिधी :- करमाळयाचा वारसा जोपासण्यासठी मी येणार आणि तुम्ही….. या आशयाचे घोषवाक्य सध्या सोशल मीडियावर वर प्रसारित होत आहे. त्याला कारण ही तसेच आहे. करमाळा तालुका ऐतिहासिक दृष्ट्या महत्वपूर्ण असतानाही शासनाच्या दुर्लक्षपणामुळे ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. करमाळा शहरातील भुईकोट किल्ल्याचे सर्व बुरुज ढासळलेले असुन फक्त वेस तेवढी शिल्लक राहिली आहे. परंतु त्याचेही शिल्लक अवशेष पावसामुळे व वाढलेल्या झाडा झुडपामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

यासाठी करमाळयातील तरुणांनी एकत्रीत येत *दुर्गसेवक करमाळकर* या नावे भुईकोट किल्ला स्वच्छ्ता मोहिम क्रमांक 1 चे आयोजन *रविवार दिनांक 08/10/2023 रोजी सकाळी 10 वाजलेपासून* केले आहे. आपण आपला वारसा (किल्ला) टिकवून इतर किल्ल्यांची मोहिम आखावी या दृष्टीने दुर्गसेवक करमाळकर यांनी मोहिम क्रमांक १ ही करमाळयाच्या भूईकोट किल्ल्याची स्वच्छ्ता व डागडुजी करून करणार असल्याचे सांगितले. यासाठी सोशल मीडियावर इतिहास प्रेमी व करमाळा वासियांना मोहिमेत सहभागी होण्यासाठी जाहीर आवाहन करण्यात आले आहे. सदर आवाहनास अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून मोहिमेचा उद्देश सफल होणार असल्याचेही दुर्गसेवक करमाळकर यांनी सांगितले आहे.

भरकटलेली तरुणाई, व्यसनाधीन झालेली तरुणाई, मोबाईल मधील विविध ॲप वर जुगार खेळणारी तरुणाई आपण सर्वत्र पाहतो व त्याबद्दल फक्त खेद व्यक्त करतो. परंतु काही तरुणाई अशी ही आहे जी आपला शहराचा वारसा जोपासण्यासाठी सरसावत आहे व भरकटलेल्या, व्यसनाधीन झालेल्या तरुणांना चांगल्या विचाराने प्रेरित करेल. यासाठी मी माझ्या मुलांसह या मोहिमेत सहभागी होणार आहे.

गणेश तोडकर, नागरीक

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *