करमाळा प्रतिनिधी
संघर्षमय जीवनातून जिद्द, चिकाटी परिश्रम याच्या जोरावर यशस्वी वाटचाल करणारे मुकुंद साळुंखे सर यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी आहे असे मत जगताप गटाचे युवा नेते, कृषी उत्पन्न बाजार समिती संंचालक, भाजप जिल्हा युवा मोर्चाचे
जिल्हाध्यक्ष शंभुराजे जगताप यांनी व्यक्त केले. मुकुंद साळुंखे सर यांनी चांदगुडे पेट्रोल पंपा जवळ करमाळा बायपास चौकामध्ये नव्याने सुरू केलेल्या फौजी स्नॅक्स सेंटरच्या उद्घघाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून
यशकल्याणीचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील, युवा सेनाचे जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, पोपट थोरात गुरूजी, सामाजिक कार्यकर्ते महादेव फंड, नगरसेवक अतुल फंड, प्रताप बरडे सर, पत्रकार आशपाक सय्यद, जयंत दळवी, मयूर
साळुंखे, सौरभ साळुंखे, मा. सरपंच खंडू काळे, उत्तम हानपुडे सर, महादेव खरात, दत्तात्रय दळवी, संजय सोनवणे उपस्थित होते. यशकल्याणीचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ करे पाटील म्हणाले की मुकुंद साळुंखे सर यांनी शिक्षक या नात्याने आदर्श काम केले असून माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष या माध्यमातुन शिक्षकांना न्याय मिळवुन देण्याचे काम केले असुन त्यांचे कार्य अविरतपणे चालु आहे. धन निरंकार मंडळाच्या माध्यमातून आध्यात्मिक कार्य चालु आहे. मनुष्य जीवनामध्ये खरा पुरुषार्थ सांगितला असून आपल्या जीवनामध्ये त्यांनी आपल्या कुटुंबाबरोबर समाजाची सेवा करण्याचे काम केले आहे. जीवनात आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण काम करत असो सत्याच्या व प्रामाणिकतेच्या जोरावर आपण यशस्वी होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण मुकुंद साळुंखे सर यांचे आहे. स्वेच्छा निवृत्तीनंतरही स्वस्थ न बसता सतत कामाची आवड ध्यास असलेले साळुंके सरांनी स्नॅक़स सेंटर सुरु केले आहे. याचा आदर्श युवा पिढीने घेऊन नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसाय करावा असे ते म्हणाले. फौजी स्नॅक्स सेंटरच्या भावी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुकुंद साळुंके सरांनी सुरू केलेल्या स्नॅक़्स सेंटरला शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या उद्घघाटन संमारंभास सर्व क्षेत्रातील मान्यवर शिक्षक स्टाॅफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.