करमाळा प्रतिनिधी
दि.२९/९/२०२३ विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास बेंगलुरू येथील नॅशनल अॅसेसमेंट अँड अॅक्रिडिटेशन कौन्सिल (नॅक) या संस्थेच्या पथकाने भेट देवून महाविद्यालयाच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण केली.
नॅकद्वारे गठित करण्यात आलेल्या पिअर टीमचे अध्यक्ष जबलपूर येथील महाकौशल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रमेश चंद्र मिश्रा हे होते. तसेच त्यांच्या समवेत समन्वयक म्हणून डॉ. श्रीलथा के. (केरळ) आणि सदस्य डॉ. रामनाथन सुब्रमण्यम (तामिळनाडू) यांनी काम पाहिले.
विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, सहसचिव विक्रम सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे (वरिष्ठ विभाग), उपप्राचार्य प्रा. संभाजी किर्दाक, नॅक कोऑर्डिनेटर प्रा. अभिमन्यू माने, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या उपस्थित महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सैनिकांनी नॅक समितीचे स्वागत गार्ड ऑफ ऑनर देवून व विद्यार्थिनींनी औक्षण करून केले.
या दोन दिवसीय भेटीमध्ये नॅक समितीने महाविद्यालयीन कामकाजाची तपासणी केली तसेच आजी व माजी विद्यार्थ्यां बरोबर संवाद साधला.
समितीच्या सन्मानार्थ महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.नितीन तळपाडे आणि एन.सी.सी. चे केअर टेकर ऑफिसर निलेश भुसारे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या माध्यमातून सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यकमास नॅक समितीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, मनापासून दाद दिली आणि सर्वकलाकरांचे कौतूक केले.
नॅक समिती भेट दौरा यशस्वी होण्यासाठी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कमचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.