
करमाळा प्रतिनिधी
लघु पाटबंधाय्राचे उपविभागीय अभियंता संजय आवताडे, कनिष्ठ अभियंता शिंदे, दफ्तर कारकून विजय झुंडरे, कालवा निरीक्षक राणी कदम मॅडम, आजिनाथ शिंदे, उपसरपंच खांबेवाडी नवनाथ शिंदे, विनोद महानवर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष

अनिल गायकवाड, ग्रा.पं. सदस्य निलज तात्यासाहेब शिंदे, अर्जुन नलवडे, ऋतुराज शिंदे, संदिप शिंदे, मयुर शिंदे, साहेबराव नगरे, सतिश गायकवाड, राजू भालेराव, शुभम शिंदे, आजिनाथ शेळके, अभिषेक महानवर, मुन्ना टकले, सतिश नगरे,

बाबासाहेब शिंदे, कृष्णा खराडे, अनिल येताळ, बालाजी भोई, गोपाळ टकले, शरद गायकवाड, नितीन गोफणे, इंद्रजित शिंदे, दादासाहेब नरुटे, इ. शेतकऱ्यांकडून लोकसहभागातून दरवाजे वाहतूक केली आणि शासकीय यंत्रणेतील कर्मचारी व कामगार वर्गांनी संगोबा बंधाय्राचे दरवाजे टाकण्याचे काम चालू केले.

यामध्ये काल पासुन अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा तालुकाध्यक्ष ॲड. शशिकांत नरुटे यांनी शासकीय स्तरावर आवाज उठवून बंधारा आडविण्याकामी प्रयत्न केले. दुष्काळसदृश परिस्थितीला या सीनाकाठ परिसरातील शेतकरी वर्ग सामोरे जात असल्याने ॲड. शशिकांत नरुटे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या भागातील संगोबा, बोरगाव, निलज, खांबेवाडी, पोटेगाव व बाळेवाडी या भागातील अनेक शेतकरी एकत्र येऊन लोकसहभाग व शासकीय यंत्रणा यांच्या माध्यमातून हे काम चालू केले. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यामध्ये शासकीय अधिकारी वर्गाने पूर्णपणे सहकार्य केले. यामुळे सीना परिसरातील शेतकऱ्यांकडून पाटबंधारे खाते यांचे आभार व्यक्त केले जात आहेत. या हंगामात जास्तीत जास्त पाणी तरटगाव, पोटेगाव व संगोबा बंधाय्रात टेल टू हेड आवडण्यात यावे, अशी भावना शेतकऱ्यांकडून होत आहे.