
स्नेहालय स्कूल मध्ये नागपंचमीनिमित्त पतंग मोहोत्सव
करमाळा प्रतिनिधी
स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये नागपंचमीनिमित्त पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

कटिरे कटी पतंग कटी अशा संगीताच्या तालावर शालेय विद्यार्थ्यांनी पतंग उडविण्याचा आनंद घेतला होता. विविध कलरचे पतंग आणले होते तसेच शालेय विद्दार्थींनींनी झोका,फेर धरले,मेहंदी व नखपाँलीस काढण्यात आली होती.यावेळी स्नेहालय स्कूलचे संस्थापक जयंत दळवी, मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार या महोत्सवाचे नियोजन शालेय शिक्षकांनी केले होते
