कुकडी डाव्या कालव्यातील पौधवडी चारीचे उर्वरित कामे करण्यासाठी 21कोटी मंजूर – देवानंद बागल व महेश चिवटे

करमाळा प्रतिनिधी

पोंधवडी चारीचे उर्वरित कामे अपूर्ण  राहिल्यामुळे वीट कुंभेजला पाणी मिळत नव्हते. या प्रकल्पाची कामे पूर्ण करावी या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली सहा महिन्यापासून शिवसेनेचे पदाधिकारी पाठपुरावा करत होते. पूर्वीच्या काळात सुद्धा रास्ता रोको उपोषण अशी आंदोलने शिवसेनेने केली होती.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर शिवसेना संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली या कामाला गती देण्याची मागणी करण्यात आली होती.

जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मुंबई येथे या संदर्भात निवेदन देण्यात आले होते.

या सर्व पाठपुराव्यामुळे कुकडी डावा कालवा पोंधवडी शाखा कालवा क्रमांक सहा ते बारा व पोंदवडी वितरिका किलोमीटर एक ते तीन मधील उर्वरित बांधकाम करण्यासाठी 19 कोटी 15 लाखाचा निधी मंजूर झाला आहे.

तसेच पोंधवडी शाखा कालव्यावरील शेत सारी व निसऱ्याची भाग एकची कामे करण्यासाठी 1 कोटी 46 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

हा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडवणीस व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे करमाळा शिवसेनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

**

बिभीषण आवटे, जिल्हा परिषद सदस्य वीट

पोंधवडी चारीचे कामगिरी दहा ते पंधरा वर्षापासून प्रलंबित होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडवणीस यांनी सकारात्मक विचार करून करमाळा तालुक्यातील कुकडील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला याबद्दल आम्ही आभारी आहोत.

***

महेश  चिवटे, जिल्हाप्रमुख शिवसेना

कामाची निविदा प्रक्रिया दहा ते पंधरा दिवसात निघेल या कामात अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी संगनमताने निकृष्ट दर्जाचे काम केले तर त्यांची गय केली जाणार नाही. पहिल्या झालेल्या कुकडीच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्यामुळे निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत. या कामाचे काम घेणारे कंत्राटदारांनी व अधिकाऱ्यांनी संगणमत करून निकृष्ट दर्जाची कामे करू नयेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *