संगोबा येथे भक्तांची पिण्याच्या पाण्या वाचून मोठे हाल

करमाळा प्रतिनिधी

धाकटी पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री संगोबा येथे भक्तांची पिण्याच्या पाण्या वाचून मोठे हाल झाले. आषाढी एकादशीनिमित्त भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ महाराज देवस्थान

संगोबा हे देवस्थान तीन जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून सोलापूर, धाराशिव व अहिल्यानगर या तीन जिल्ह्यातून करमाळा, जामखेड, कर्जत, भूम, परांडा या तालुक्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात. परंतु पोथरे ग्रामपंचायत

व निलज ग्रामस्थ व करमाळा पंचायत समिती प्रशासनातील अधिकारी साधे पिण्याचे पाणी सुद्धा यात्रेकरूंना देऊ शकत नाहीत, ही खेदाची बाब आहे. सीना नदीच्या काठावर वसलेले आहे. “पाणी उशाला कोरड घशाला” या म्हणीप्रमाणे संगोबा

देवस्थानची परिस्थिती निर्माण झालेली आहे. जर पंधरा दिवसांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी भक्तांना नमिळाल्यास बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने करमाळा पंचायत समिती समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा बळीराजा

शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी दिला आहे. यावेळी संदिपान गायकवाड, बळीराम राऊत, गोपाळ टकले, विजय टकले, परशुराम लोखंडे, तात्या लोखंडे, रामा गायकवाड, युवराज जाधव, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *