राजमाता पुण्यश्लोक अहिल्याराणी होळकर यांच्या 298व्या जयंतीनिमित्त करमाळा येथील कुटीर रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप तर श्री गणेश गो शाळा या ठिकाणी जनावरांसाठी ओला चारा वाटप करण्यात आला.
करमाळा प्रतिनिधी
राष्ट्रीय समाज पक्ष व सकल धनगर समाज आयोजित पुण्यश्लोक अहिल्याराणी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यापैकी करमाळा कुटीर रुग्णालयातील रुग्णांसाठी केळी,सफरचंद अशी फळे वाटप करण्यात आली. यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून करमाळा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अहमद चाचा कूरेशी व
आ.स.सा.कारखान्याचे माजी संचालक धुळा भाऊ कोकरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि फळे वाटप केले तर श्री गणेश गो शाळा नगर रोड या ठिकाणी मुक्या जनावरांसाठी ओला चारा देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर निलेश मोटे तर वर्धमान खाटेर यांच्या हस्ते गो शाळेतील जनावरांसाठी चारा वाटप करण्यात आला. आनावश्यक खर्चाला फाटा देत मुक्या
जनावरांसाठी चारा व रुग्णांसाठी फळे वाटप करून पुण्यश्लोक राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव गाडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे,बालरोग तज्ञ प्रशांत करंजकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष जीवन होगले,
सामाजिक कार्यकर्ते प्रवीण होगले, नरेंद्रसिंह ठाकूर,धनगर धर्म पिठाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब टकले, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, श्यामजी सिंधी, सचिन काळे, डॉ.गजानन गुंजकर, डॉक्टर स्मिता बंडगर, जेआरडी माझाचे संपादक पत्रकार जयंत दळवी, प्राध्यापक श्रीकांत दरगुडे सर, शुभम बंडगर, विशाल कोळेकर, शहाजी झिंजाडे,नानासाहेब
मारकड,राजू कांबळे, सुरेश धेंडे, रघुवीर खटके, विकास मेरगळ, शिवाजी हिरडे, अस्लम सय्यद, जहांगीर पठाण, विठ्ठल खांडेकर, नितीन मासाळ, सुनील गोपने, सुग्रीव कोऺडलकर इत्यादी उपस्थित होते. या प्रसंगी प्रस्ताविक बाळासाहेब टकले तर आभार वर्धमान खाटेर व अंगद देवकते यांनी मांडले.