युवासेनेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिना निमित्त अभिवादन
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहर युवा सेनेच्या वतीने आज ३५० व्या शिवराज्याभिषेक दिना निमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळेस नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
युवासेना शहर प्रमुख समिर परदेशी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळेस उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, जिल्हा सचिव आदेश बागल, सोहेल पठाण, तालुका प्रमुख शंभू फरतडे, उपशहरप्रमुख अदित्य जाधव, कल्पेश राक्षे, ओंकार कोठारे आदि उपस्थित होते.