मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाण्या संदर्भात पुणे येथे बैठक
करमाळा प्रतिनिधी
करमाळा, माढा आणि माळशिरस तालुक्यातील उजनी, कुकडी, कृष्णा मराठवाडा प्रकल्प, सिना कोळेगाव, नीरा देवघर सिंचन व पुनर्वसन संदर्भातील करमाळा, माढा व माळशिरस तालुक्यातील अडीअडचणी संदर्भात आमदार रणजितसिंह मोहितेपाटील यांनी सिंचन भवन, पुणे येथे कृष्णाखोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, पुणे विभागाचे मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, विशेष प्रकल्पाचे मुख्य अभियंता एच.टी.धुमाळ यांचे सोबत शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. आज या बैठकीसाठी सिंचन भवन पुणे येथे उपस्थित राहून सहभागी झालो.
करमाळा तालुक्यातील मांगी तलाव हा कुकडी लाभक्षेत्रात समाविष्ट करणे, दहिगाव सिंचन योजना प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावित, कुकडी प्रकल्पाचे पाणी करमाळा तालुक्यात मिळणे, सीना माढा उपसा सिंचन योजनेतून वंचित गावांना समाविष्ट करणे, फूट ब्रीज दुरुस्ती, सीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना बर्गे उपलब्ध करून देणे यासह विविध मागण्या संबंधित अधिकाऱ्यांकडे मांडल्या. यासह इतर अनेक सिंचन संदर्भातील प्रश्नांवरती चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या भावनांची दखल घेऊन तातडीने यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
आ.मोहिते पाटील यांनी प्रत्येक तालुका निहाय आढावा घेत असताना मुद्देसूद मांडणी व आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचे म्हणणे ऐकून घेतले, यावर अधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक उत्तरे दिली. सिंचन भवनात शेतकरी, अधिकारी व पदाधिकाऱ्यांची आजची बैठक ही ऐतिहासिक अशी झाली. बैठकीसाठी करमाळा, माढा व माळशिरस तालुक्यातील शेकडो शेतकरी आज सिंचन भवनात दाखल झाले होते. बैठकीनंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारची आशा दिसून येत होती.
यावेळी आ.राम सातपुते, मा.आ.नारायण पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील, पुणे पाटबंधारे मंडळाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप, सोलापूरचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव बागडे, अधीक्षक अभियंता कोल्हे, कार्यकारी अभियंता संजय बोडके, कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता डुबल, जलतज्ञ अनिल पाटील, शिवाजी कांबळे, भारत पाटील, अजित तळेकर, शिवाजी बंडगर, अमरजीत साळुंखे, महेंद्र पाटील, जगदीश अग्रवाल, शिवशंकर माने, शशिकांत पवार, शशिकांत नरूटे, नितिन कांबळे आदींसह करमाळा, माढा व माळशिरस तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.