कमलाभवानी कारखान्यावर पर्यावरण दिन साजरा

करमाळा प्रतिनिधी

कमलाभवानी कारखान्याचे चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली कमलाभवानी साखर कारखान्यावर पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात सादर करण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उप प्रादेशिक कार्यालय सोलापूर यांनी पर्यावरण

दिन साजरा करणे बाबत मार्गदर्शन केले होते.प्लास्टिक प्रदूषणावर मात करा अशा प्रकारचे घोषवाक्य महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केल्याने कारखान्याचे जनरल मॅनेजर क्षिरसागर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना प्लॅस्टिक कमीत कमी वापरा

बद्दलचे मार्गदर्शन केले शक्यतो प्लास्टिक वापरू नये असे सांगितले. जल प्रदूषण, भू प्रदूषण आणि वायू प्रदूषण या सर्वच ठिकाणी प्रदूषणावर नियंत्रण होण्याची गरज असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. त्यावेळी कारखान्याचे चीफ अकौंट उबाळे,

मुख्य शेती अधिकारी जगदाळे यांनीही मार्गदर्शन केले व आपला परिसर स्वच्छ करण्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांना सुचित करण्यात आले. कारखान्याच्या प्रमुख गेट समोर प्लास्टिक प्रदूषणावर मात करा अशा प्रकारचे बॅनर लावून देखील या

माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यावेळी कारखान्याचे सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी रामहरी जगताप यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *