मंत्री तानाजी सावंत यांनी जेष्ठ नेते डांगे यांचा अपमान केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डांगेच्या पाठीशी – मांढरे-पाटील
करमाळा प्रतिनिधी
काल सोनारी येथील कारखाना वरती आदिनाथ सह साखर कारखाना प्रशासक मंडळ नियुक्ती चे पत्र देण्याच्या वेळी मंत्री तानाजी सावंत यांनी पितृतूल्य नेतृत् डांगे साहेब यांच्या बाबतीत जे वक्तव्य केले ते अतिशय चुकीचे आहे त्यांना विसर पडला
आहे. ज्या आदिनाथ कारखाना वरती ते प्रशासक मंडळ नियुक्त करत आहेत त्या आदिनाथ साठी डांगे व शहाजी देशमुख सर यांनी पुढाकार घेऊन मोठी शेतकरी चळवळ उभी केली होती, लोकवर्गणी गोळा केली त्यांच्या मुळे आजचा दिवस मंत्री तानाजी
सावंत यांना पहायला मिळाला आहे. परंतु मंत्री तानाजी सावंत यांना या गोष्टी चा विसर पडला कमीत कमी डांगे साहेब यांच्या वयाचा विचार करून बोलणं गरजेचं होतं. मंत्री पदाची हवा त्यांच्या डोक्यात शिरली आहे. ज्या लोकांच्या जिवावर आपण मंत्री
पदा पर्यंत पोहचला ती जनता येत्या काळात खाली खेचल्या शिवाय राहणार नाही. डा़ंगे साहेबांनी देखील आपल्या वयाचा विचार करता चुकीच्या लोकांच्या भुलथापाला व अमिषाला बळी न पडता आपला स्टेटस सांभाळावा अमिषाला बळी पडून
भरकटू नये. ज्याची वेळ खराब आहे त्यांची साथ द्या, ज्यांची नियत खराब आहे त्यांची सावली देखील पडू देऊ नये, परंतु डांगे यांचे उलट झाले आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येत्या काळात आपला झालेल्या अपमानाचा बदला नक्की घेईल आणि
आपल्याला सोबत कायम राहील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे करमाळा तालुका अध्यक्ष हनुमंत मांढरे -पाटील यांनी व्यक्त केले आहे.