तालुक्याचे विकासासाठी आपण आपला वेळ निश्चितपणे सर्वसामान्य जनतेसाठी देत आहोत-संचालिका रश्मीदीदी बागल
करमाळा प्रतिनिधी- सत्ता असो अथवा नसो लोकनेते स्वर्गीय दिगंबररावजी बागल मामा यांचे विचारातूनच करमाळा तालुक्याचे विकासासाठी आपण आपला वेळ निश्चितपणे सर्वसामान्य जनतेसाठी देत आहोत. व प्रसंगी मंत्रालयीन पातळीवरूनही विकास कामांचा आपण पाठपुरावा करून भरघोस निधी मंजूर करून आणू असा विश्वास राज्य सहकारी साखर संघाच्या संचालिका व बागल गटाच्या नेत्या रश्मीदिदी बागल यांनी आज येथे व्यक्त केला. यावेळी माजी आमदार शामलताई बागल व मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल उपस्थित होते. वांगी नंबर तीन येथील विविध विकास कामांकरता साखर संघाच्या संचालिका व बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांना दिनांक 2 डिसेंबर 22 रोजी शिफारस पत्र दिले होते. त्यामध्ये वांगी नंबर तीन गावातील विविध विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून विविध विकास कामे मंजूर करणेबाबत शिफारस केली होती. त्यानुसार जन सुविधा योजना लेखाशीर्ष 2515, 1407 दिनांक 17 मार्च 2023 चे पत्रानुसार निधीची तरतूद करून कामे मंजूर झालेली आहेत .त्याप्रमाणे वांगी नंबर तीन मधील श्री अंबाबाई मंदिरासमोर पेवर ब्लॉक बसविणे करिता रुपये तीन लाख एसटी स्टँड ते पांडेकर घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे याकरता 3 लाख प्रवीण कात्रेला घर ते गुरुलिंग पांडेकर घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे या कामाकरता रुपये तीन लाख अशोक कात्रेला घर ते आनंद भानवसे घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे या कामाकरता रुपये तीन लाख असा 12 लाखाचा निधी तर वांगी नंबर तीन मधील दलित वस्ती मधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनगर येथील बंदिस्त गटारीचे कामा करीता रुपये पाच लाख भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनगर येथे पेवर ब्लॉक बसवणे कामासाठी रुपये एक लाख तर चांभार वस्ती येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे या कामाकरता रुपये तीन लाख असे एकूण नऊ लाख तर एकूण सर्वच विकास कामांकरिता 21 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. या सर्व कामांचे लवकरच भूमिपूजन होईल. यावेळी वांगी गावचे कर्तव्यदक्ष उपसरपंच संतोष कांबळे,आदिनाथ कारखान्याचे संचालक पांडुरंग जाधव, मकाईचे संचालक संतोष देशमुख, वांगी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन डॉक्टर विजय रोकडे युवराज रोकडे, गणेश तळेकर, अर्जुनराव तकिक, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ रोकडे, सदस्य चंद्रकांत कदम, पंचायत समितीचे माजी सदस्य सुहास रोकडे ,ग्रामपंचायत सदस्य शंकर जाधव,सुरेश भानवसे, सरपंच मयुर रोकडे,आदी मान्यवर उपस्थित होते. या मंजूर केलेल्या कामांमुळे वांगी ग्रामस्थांनी साखर संघाच्या संचालिका रश्मीदिदी बागल व पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *