करमाळा तालुक्यातून महाड ते वनंद धम्म सहल प्रवास संपन्न…

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे वारसदार व अनुयायी यांची करमाळा ते महाड वनंद धम्म सहल काढण्यात आली होती, करमाळा येथून महाड येथे 20 मार्च 1927  रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता,  पशुपक्षी, जनावरे त्या तलावातील पाणी पिऊ शकतात आम्ही तर माणस आहोत आम्ही का पाणी पिऊ

शकत नाही म्हणून अस्पृश्यांसाठी लढा उभा करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी चवदार तळ्याचा संघर्ष करून चवदार तळे सर्वांसाठी खुले करून दिले,  दरवर्षी 20 मार्चला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भीम सैनिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात  आणि तेथून रमामाता स्मारक पाहण्यासाठी त्यांच्या

जन्मगावी वनंद जिल्हा रत्नागिरी येथे रमा मातेला अभिवादन करण्यासाठी जातात, यावेळी करमाळा तालुक्यातील  बोध्दाचार्य भालचंद्र गाडे, भिमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल भोसले, बापु उघडे सर,  महेश कांबळे सर,  इंडिया पॅंथर सेनेचे करमाळा युवा तालुकाध्यक्ष चंद्रकांत साळवे,  सुनिल जगताप,  गौतमी पोळके, पूनम भोसले,  सारिका साळवे, माया गाडे, साधना गाडे,  ममता ओव्होळ,  सुनिता गाडे,  सुजाता जगताप,  इ.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *