भव्य मिरवणूकीने जेऊर करांनी केले लेकीचे कौतुक
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळाल्याबद्दल जेऊरच्या लेकीची ग्रामस्थांनी काढली मिरवणूक नागरी सत्कार करून केले कौतुक. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत जेऊर ता. करमाळा येथील ज्ञानेश्वरी आबासाहेब गोडसे हिने ओ.बी.सी. प्रवर्गातून राज्यात सातवा क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे. याबद्दल ग्रामस्थ व परिसरातील लोकांच्या वतीने भव्य मिरवणूक काढून जेऊर नागरी सत्कार करण्यात आला.
ग्रामस्थांच्या वतीने व संभाजी ब्रिगेड च्यावतीने जिजाऊंचे प्रतिमा तुकाराम महाराजांची गाथा व सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चारित्र्य पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. सुभाष सुराणा यांनी प्रतिकूल परिस्थितीत सामान्य कुटुंबातून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या ज्ञानेश्वरीचे यश हे कौतुकास्पद व परिसरातील इतर मुलींसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले तर प्रशासनात गेल्यानंतर सामान्यांची कामे वेळेत पुर्ण करून एक कृतीशील व आदर्श अधिकारी म्हणून ओळख निर्माण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी उज्ज्वला मेहता होत्या सुरवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राजक्ता गोडसे यांनी केले. यानंतर मान्यवरांची भाषणे झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कर्चे सर यांनी केले तर तर आभार आबासाहेब गोडसे यांनी मानले. यावेळी डॉ. शारदा सुराणा, संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके, डाॅ एस. व्ही. होळकर, हरिदास डांगे, ॲड. सविता शिंदे, विजया कर्णवर, बंकट कदम, अभय लुंकड, ॲड. शहानुर सय्यद, गजेंद्र पोळ, सचिन धारक, अण्णासाहेब निमगिरे, आदिनाथ माने, राकेश पाटील, अतुल निर्मळ, सुहास शिंदे, अभिजीत म्हमाणे, समीर केसकर, नानासाहेब घोरपडे, वैभव मोहिते, दीपक
सुरवसे, महादेव शिंदे, शुभम कर्चे, हनुमंत मोहिते, संतोष निर्मळ, समाधान जाधव, नवनाथ निर्मळ यांच्यासह परिसरातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते.
जेऊर ता. करमाळा येथील ज्ञानेश्वरी आबासाहेब गोडसे हिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळाल्याबद्दल गावातून मिरवणूक काढण्यात आली.