करमाळ्यात डायलिसिस प्रक्रिया यशस्वी

५ मशीनद्वारे रोज १० रुग्णांना मिळणार डायलेसिस ची सेवा

करमाळा प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या वतीने करमाळा येथे डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले असून आज येथे प्रथम रुग्णांना डायलिसिस सेवा देण्यात आली. सेवा करमाळ्यात उपलब्ध झाल्यामुळे संबंधित रुग्णांना आधार निर्माण झाला आहे. स्वातंत्र्य सैनिक मनोहर पंत चिवटे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल च्या वतीने ही सेवा आजपासून करमाळा इथे सुरू करण्यात आली आहे. केम तालुका करमाळा येथील रामेश्वर बिचितकर या रुग्णाला सेवा देण्यात आली. यासाठी डॉ. बबन यमकर व बबन मुळे यांनी देखभाल केली.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक पक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्या प्रयत्नातून हॉस्पिटलची कार्यकारी संचालक दीपक पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली सेंटर सुरू झाले आहे. यावेळी यशस्वी डायलिसिस सेवा पूर्ण झाल्यानंतर रामेश्वर बचत कर यांचा सत्कार स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष नरसिंह चिवटे यांच्या हस्ते करण्यात आला. एवढी वैद्यकीय सहाय्यक नागेश शेंडगे, राजेंद्र मिरगळ, संजय जगताप, मारुती भोसले, निलेश चव्हाण, आदि जण उपस्थित होते.

बोलताना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत व प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या सहकार्यातून ही डायलिसिस सेवा या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. भावी काळात पूर्ण अल्प दरात सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यात काम करणार असल्याचे सांगितले. श्री कमला भवानी ब्लड सेंटरची सुरुवात करून करमाळा तालुक्यातील रुग्णांना करमाळा तालुक्यातील मिळून देण्याची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *