करमाळा-कोल्हापूर गाडीचे स्वागत
जेआरडी माझा
महाराष्ट्रातला तमाम भाविक भक्त चैत्र महिन्यामध्ये ज्योतिबाच्या दर्शनासाठी जात असतो. करमाळा तालुक्यामधील ही अनेक भाविक भक्त दर्शनासाठी जातात परंतु, थेट गाडी नसल्यामुळे महिला, वयोवृद्ध यांना गैरसोय होत होती परंतु करमळा आगाराने आज पासून करमाळा-कोल्हापूर गाडी सुरू केल्यामुळे भाविकांची सोय होणार आहे असे मत करमाळा पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी व्यक्त केले, यावेळी आगार प्रमुख अश्विनी किरगत या उपस्थित होत्या. भाजपा माजी शहराध्यक्ष संजय घोरपडे यांनी गाडी चालू करण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली होती.
पुढे बोलताना गुंजवटे म्हणाले की, जे आर्थिक सधन आहेत ते वाहनांनी जाऊ शकतात, परंतु मध्यमवर्गीय कुटुंबांना एसटी सोयीची ठरते. महिला असोत ज्येष्ठ नागरिक असो यांची सोय होणार आहे.
सुट्टीच्या काळामध्ये वाहन व्यवस्था अपुऱ्या असतात. त्यामध्ये करमाळा आगाराने करमाळा-कोल्हापूर ही गाडी सुरू करून करमाळा शहर व तालुक्यातील प्रवाशांसाठी चांगली सोय केलेली आहे. करमाळा आगाराचे काम सोलापूर जिल्ह्यात उल्लेखनीय आहे ही तुम्हा आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
यावेळी संजय घोरपडे, अमरजीत साळुंखे यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक नरेंद्रसिंह ठाकूर यांनी केले. यावेळी चालक पवार व वाहक काळे यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास भाजपा तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे, श्री रामचंद्र बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जयंत दळवी, नंदन प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेश कटारिया, भाजपा महिला आघाडीच्या नेत्या आनंदीताई दिघे पाटील, बळीराजा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अण्णा सुपनर, रासप जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, अतुल बोकन, सुशील राठोड, आळजापूर चे परमेश्वर काळे, शाहूदादा फरतडे, वाहतूक नियंत्रक करण मुसळे, वाहतूक नियंत्रक सोमनाथ नवले, एटीएस एस. व्ही. कदम, जीए अरुण घोलप, एसटी कामगार नेते विजय खटके, करमाळा आगारातील चालक, वाहक, कर्मचारी आदी उपस्थित होते. निवेदनाच्या मागणीप्रमाणे करमाळा-कोल्हापूर तसेच बारामती मार्गे करमाळा-सातारा या दोन्ही गाड्या सुरू केल्याबद्दल संजय घोरपडे यांनी आभार व्यक्त केले.