करमाळा ते कोल्हापूर जोतिबा बस सुरू करण्यात यावी
जेआरडी माझा
करमाळा ते कोल्हापूर जोतिबा डोंगर बस सुरू करण्यात यावी अशी मागणीची निवेदन भाजप माजी शहराध्यक्ष संजय अण्णा घोरपडे यांचे नेतृत्वाखाली करमाळा बस स्थानक प्रमुख अश्विनी किरगत यांना देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की चैत्र महिना गुढीपाडव्यानंतर करमाळा तालुक्यातील अनेक भाविक भक्त ज्योतिबासाठी दरवर्षी जात असतात तालुक्यातील अनेक भाविकांचे कुलदैवत ज्योतिबा हे आहे ,परंतु कोल्हापूर गाडी सद्यस्थितीत चालू नसल्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते ,ही गैरसोय दूर करण्यासाठी लवकरात लवकर कोल्हापूर गाडी सुरू करण्यात यावी तसेच बारामती मार्गे असणारी सातारा गाडी पुन्हा सुरू करण्यात यावी ही मागणी करण्यात आली
यावेळी तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे ,अभाविप अध्यक्ष संतोष कांबळे ,भाजपा व्यापाऱी आघाडी शहराध्यक्ष जितेश कटारिया ,
संजय गांधी योजनेचे नरेंद्रसिंह ठाकूर, शेखर स्वामी आदी उपस्थित होते.