करमाळा तालुक्यातील रस्ते व बांधकामासाठी अर्थसंकल्पात 13 कोटी 61 लाख रुपयांची तरतूद. आमदार संजयमामा शिंदे
प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अर्थसंकल्पामध्ये करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील 4 रस्त्यांची सुधारणा करणे व राज्य उत्पादन शुल्क कार्यालय प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे या 5 कामांसाठी एकूण 13 कोटी 61 लाख रुपये निधीची तरतूद केली असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
4 रस्ते कामामध्ये करमाळा बोरगाव घारगाव ते जिल्हा हद्द रस्ता प्रतिमा 5 सुधारणा करणे – 4 कोटी 50 लाख, राज्य मार्ग 145 ते शेडशिंगे प्रमुख जिल्हा मार्ग 132 सुधारणा करणे – 1 कोटी, लव्हे म्हैसगाव रस्ता प्रजिमा 14 पुलाचे बांधकाम करणे -3 कोटी, रोपळे रोपळे केम वडशिवणे कंदर ते कन्हेरगाव रस्ता प्रजिमा 12 सुधारणा करणे -1 कोटी, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कुर्डूवाडी या कार्यालयाचे प्रशासकीय इमारत बांधकाम साठी 4 कोटी 11 लाख अशी एकूण 13 कोटी 61 लाख रुपये निधीची तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली असल्याची माहिती आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली.
चौकट –
2022 अर्थसंकल्पीय स्थगिती दिलेल्या रस्ते कामांची स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्नशील…
2022 च्या अर्थसंकल्पामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये मंजूर झालेल्या रस्ते सुधारणा करण्याच्या 10.92 कोटी रुपयांच्या निधीच्या कामावरती शिंदे – फडणवीस सरकारने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती ही आ. संजयमामा शिंदे यांनी दिली .यामध्ये बोरगाव करंजे मिरगव्हाण निमगाव गौंडरे नेरले ते वरकुटे घोटी निंभोरे रस्ता सुधारणा करणे -2 कोटी 85 लाख, मिरगव्हाण अर्जुननगर शेलगाव क सौंदे वरकटने कोंढेज रस्ता प्रजिमा 8 सुधारणा करणे -1 कोटी 90 लाख, कोर्टी दिवेगव्हाण पारेवाडी रेल्वे स्टेशन ते केतुर 2 ते पोमलवाडी रस्ता सुधारणा करणे -2 कोटी 85 लाख, पारेवाडी राजुरी अंजनडोह झरे कुंभेज निंभोरे मलवडी दहिवली कनेरगाव ते वेणेगाव रामा 9 ला जोडणारा प्रजिमा 4 सुधारणा करणे -3 कोटी 32 लाख या कामावरील स्थगिती उठवण्यासाठी ही आपले प्रयत्न सुरू असल्याची माहिती आ.शिंदे यांनी दिली