स्नेहालय स्कूल यश कल्याणी संस्थेतर्फे शालेय विद्यार्थ्यांना बक्षीस, प्रमाणपत्र, वितरण
करमाळा प्रतिनिधी
श्रीरामचंद्र बहुउद्देशीय सामाजिकसेवाभावी संस्था संचलित स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल,यशकल्याणी संस्था संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बक्षीस, प्रमाणपत्र,ट्रॉफी, मेडल वितरण समारंभ संपन्न झाले आहे.
यश कल्याणी सेवा भवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ सौ शिवानी रोहन पाटील यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष यशकल्याणी संस्थेचे विश्वस्त शितलताई गणेश करे पाटील होत्या ,साहित्यिक अंजली सत्यपाल श्रीवास्तव,बिले स्कूलचे विश्वस्त सौ स्वाती युवराज बिले,मथ्था अकेडमीचे ज्योती दिनेश मुथ्था,डॉ प्रियांका निलेश मोठे, कार्यक्रमाचे आयोजक स्नेहालय स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ धनश्री जयंत दळवी आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रथम सावित्रीबाई फुले, जिजाऊ आदि प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते.प्रथम प्रास्ताविक मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांनी केले तर यावेळी डाँ सौ पाटील, सौ करे पाटील, सौ श्रीवास्तव,सौ बिले,सौ मुथ्था,सौ मोठे,काही विद्यार्थी व पालक महिलांनीही मनोगत व्यक्त केले होते.यावेळी यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, स्नेहालय स्कूलचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्नेहालय स्कूलच्या सहशिक्षिका सीमा कोरडे,शिवांगी शिंदे,हेमा शिंदे,पल्लवी माळवे ,फरहान खान,शुभांगी खळदकर,कोमल बत्तीशे,अंजुम कांबळे,सविता पवार, रोहिणी गरड , बाबा तांबोळी,अंकुश नाळे ,कृष्णा पवार,राहुल पलंगे आदिंनी परिश्रम घेतले होते यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सीमा कोरडे यांनी केले तर आभार शुभांगी खळदकर यांनी मानले होते
…..
स्नेहालय स्कूलच्या सर्व आयोजकांनी महिला दिनाचे औचित्य साधुन सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला डाॅक्टरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांचा सन्मान केला आहे हे कौतुकस्पद आहे – गणेश करे पाटील, संस्थापक अध्यक्ष यशकल्याणी संस्था, करमाळा