घारगावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ लक्ष्मी संजय सरवदे यांना राज्यस्तरीय कर्तुत्ववान महिला नारी रत्न गौरव पुरस्कार 2023 जाहीर
जेआरडी माझा
घारगाव येथील ग्रामपंचायत सदस्या सौ लक्ष्मी संजय सरवदे यांना स्वप्नल फाउंडेशन पुणे या संस्थेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला नारी रत्न गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे असे संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष सौ शोभाताई बल्लाळ यांनी कळविले आहे
स्वप्निल फाउंडेशन च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील समाज दूतांना सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक कला क्रीडा सर्व क्षेत्रात उल्लेखनीय व भरीव योगदान देणाऱ्या समाज धुतांना राज्यस्तरीय गुनिजन गौरव पुरस्कार दिला जातो
सन 2023 यावर्षीचा गौरव पुरस्कार आपणास जाहीर झाला असून त्याचा आपण स्वीकार करावा
राजमाता प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने गोरगरीब, अस्थिव्यंग ,मूकबधिर, मतिमंद, निराधार, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी बांधव, यांना मोलाच असं सहकार्य सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण, डोळे तपासणी शिबिर, गोरगरिबांना अन्नधान्य वाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठी तपासणी शिबिर अशा अनेक प्रकारच्या माध्यमातून जमेल तेवढे समाजासाठी काम करत राहणे आधी सामाजिक कामे केली आहेत याची दखल घेत स्वप्नल फाउंडेशन पुणे या संस्थेने सौ लक्ष्मी संजय सरवदे ग्रामपंचायत सदस्या घारगाव यांना राज्यस्तरीय कर्तुत्ववान महिला नारी रत्न गौरव पुरस्कार जाहीर केला आहे.
पुरस्कार जाहीर झाल्याने घारगावचे माजी सरपंच किरण दादा पाटील, विद्यमान सरपंच अनिता राजेंद्र भोसले, उपसरपंच सतीश अंगद पवार, माजी सरपंच सौ लोचना नागनाथ पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मस्तुद, आशा देशमुखे, कविता होगले, समस्त घारगावकर ग्रामस्थ व तालुक्यातील सर्व मित्र परिवारा बरोबरच आप्तेष्टांनी त्यांचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला आहे
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने सर्व समाज उपयोगी आम्ही ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमचे सर्व सहकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य ,माजी सरपंच यांच्या सहकार्याने करत असतो. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व महिलाच्या अडीअडचणीसाठी व विद्यार्थ्यांसाठी सदैव सेवा करण्याचे काम करत राहणार असे लक्ष्मी सरवदे यांनी सांगितले आहे.