पारेवाडी आणि जेऊर स्टेशनवरील प्रवाशांची मागणी पुर्ण करण्याचे खासदार. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांचे ठोस आश्वासन
करमाळा प्रतिनिधी
माढा लोकसभेचे खासदार. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आज जेऊर येथे दौर्‍यावर आले असता, पारेवाडी आणि जेऊर येथिल प्रवासी संघटनेच्या मागण्यांचे निवेदन स्विकारणेत आले. या प्रसंगी त्यांनी जेऊर आणि पारेवाडी रेल्वे स्टेशनच्या प्रवाशांची मागणी विचारात घेऊन त्या ठिकाणी एक्सप्रेस गाड्यांना थांबा देणेबाबत स्वतः जातीने लक्ष घालतो आणि साधारण सहा महिन्यात प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले आहे. या प्रसंगी जेऊर प्रवासी संघटने कडुन स्वतः माजी आमदार. नारायण आबा पाटील,भाजपचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, डॉ. सुराणा व ग्रामस्थ आणि पारेवाडी रेल्वे स्थानकाकरीता माजी सरपंच. उदयासिंह मोरे पाटील, ॲड. अजित विघ्ने, अँड. बाळासाहेब जरांडे, लक्ष्मीकांत पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *