आ. संजयमामा शिंदे यांचे हस्ते मदार चित्रपटाच्या कलावंतांचा सन्मान
प्रतिनिधी
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मदार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह 5 पुरस्कार मिळाल्याबद्दल मदार टीमची मिरवणूक आणि नागरी सत्कार आज तालुकावाशीयांच्या वतीने करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचे शुभ हस्ते करण्यात आला.
प्रारंभी करमाळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला. शहरातील मुख्य पेठेतून अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. करमाळा तालुक्यातील कलावंतांनी तालुक्याचे नाव राज्य पातळीवर झळकवल्याबद्दल शहरातील नागरिकांकडून ठीक ठिकाणी सर्व कलावंतांचा सन्मान उत्स्फूर्तपणे करण्यात येत होता. मिरवणुकीची सांगता यश कल्याणी सेवाभावी संस्थेच्या सभागृहामध्ये नागरी सत्काराने झाली. याप्रसंगी आमदार शिंदे यांचे हस्ते चित्रपटातील
कलाकार- मिलिंद शिंदे, मंगेश बदर, डॉ. सुरेश शिंदे, अमृता आगरवाल, अनुजा कांबळे, आकाश बनकर, आदिनाथ जाधव या कलावंतांचा सन्मान मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
याप्रसंगी अतिशय कठीण परिस्थितीतून घोटी सारख्या खेडेगावातून संघर्ष करत पुढे आलेल्या मंगेश बदर या युवकाने अनेक संघर्षावरती मात करत यशाचा पल्ला गाठला याबद्दल मिलिंद शिंदे, आ.संजयमामा शिंदे ,प्रा. डॉ. प्रदीप मोहिते, प्रा. डॉ. नितीन तळपाडे, प्रा. अभिमन्यू माने ,यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी मंगेश बदर यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. विष्णु शिंदे यांनी केले. प्रस्ताविक प्रा. डॉ. प्रदीप मोहिते यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक प्रा. प्रदीप मोहिते, प्रा. गणेश करेपाटील, प्रा. गौतम खरात, प्रा. प्रमोद शेटे, प्रा. अभिमन्यू माने, प्रा. राम काळे, प्रा.नितीन तळपाडे, प्रा. विष्णू शिंदे, जगदीश आगरवाल, जयेश पवार, आफताब मुलाणी, राम गोडगे यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमासाठी घोटी येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *