नर्सरी चालकाने बोगस कलींगडाची रोपे दिल्याने केडगाव येथील शेतकऱ्याचे दोन लाखाचे नुकसान
चिखलठाण प्रतिनिधी
निर्सरी चालकाने बोगस कलींगडाची रोपे दिल्याने केडगाव ता करमाळा येथील सागर गायकवाड या शेतकऱ्याचे दोन‌ लाखाचे आर्थिक झाले असून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
केडगाव येथील सागर गायकवाड या युवा शेतकऱ्याने अकोले ता माढा येथिल खाजगी नर्सरीमधुन दोन एकर क्षेत्रावर कलींगड लागवड करण्यासाठी रूपयांची अकरा हजार रोपे खरेदी केली शेतीची सर्व मशागत करून बारा डिसेंबर रोजी कलींगडाची लागवडी केली योग्य खत पाणी व्यवस्थापन व मेहनत घेऊन उत्कृष्ट असा प्लॉट तयार केला दोन किलो पासुन पाच किलो वजनाचे कलींगडाचे पिक तयार झाले परंतु हे कलींगड फोडल्यानंतर आत पांढरे निघत असुन चवही लागत नाही. कलींगड व्यापार्याने या कलींगडाची खरेदी करण्यास नकार दिल्याने दोन‌ लाख रूपयाचे नुकसान झाले असुन हे नुकसान केवळ माला चुकीची बोगस रोपे दिल्याने झाले असल्याने यांची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नर्सरी चालक व संबंधीत बीज उत्पादक कंपनीकडे केली आहे. गायकवाड हे आपल्या शेतात ऊस,केळी व कलिंगड अशी विविध पिके घेतात या परिसरातील प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख असून खूप मेहनतीने व मोठ्या प्रमाणात खर्च करून कलिंगडाची लागवड दोन एकर क्षेत्रावर केली होती आज आज अखेर 70 दिवस पूर्ण पूर्ण झाले तोडणी ला आलेला प्लॉट पूर्णपणे आतून पांढरा निघाल्याने संबंधित नर्सरी चालकाला फोन करून झालेली परिस्थिती सांगितली त्यांनी काहीही तक्रार ऐकून उडवाउडवीची मिळत असल्याने त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली असुन मला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे

प्रतिक्रिया:-सागर गायकवाड (शेतकरी केडगाव)मी माझ्या दोन एकर क्षेत्रामध्ये मेलेडी जातीच्या कलिंगड रोपाची रोहित हायटेक नर्सरी येथून रोपे घेऊन लागवड केली होती 70 दिवसानंतरही कलिंगड फोडल्यानंतर ते पांढरेच निघत असून यामुळे हे कलींगड खरेदी करण्यास कोणीही व्यापारी तयार नाही. माझे श्रम पैसे वाया गेले असून दोन लाख रुपयाची आर्थिक नुकसान झाले आहे

प्रतिक्रिया २ संजय वाकडे (तालुका कृषी अधिकारी) कलिंगड रोपे खरेदीमध्ये फसवणूक झाल्याची केडगाव येथील सागर गायकवाड या शेतकऱ्याची तक्रार प्राप्त झाली असून कृषी विभागाच्या वतीने प्राथमिक पाणी करण्यात आली आहे लवकरच या संदर्भातील समीतीद्वारे तपासणी करून तक्रारीत तथ्य आढळल्यास निश्चित कारवाई करण्यात येईल


.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *