महाविद्यालयीन तरुणांनी बदलत्या काळाला अनुसरून करिअर करावे- मनोज राऊत
करमाळा दि.४/०१/२०२३ येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने गुळसडी येथे सरु असलेल्या श्रम संस्कार शिबिरामध्ये ग्रामीण विकास आणि युवक या विषयावर करमाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मनोज राऊत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुळसडी येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान यादव हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच प्रमोद भंडारे, दत्तात्रय अडसूळ, उपसरंपच योगेश भंडारे, महावीर कळसे नारायण भोसले, पोलीस पाटील धनंजय अडसूळ, ग्रामसेवक राम बडे, जि. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका एम एल आव्हाड, सूरज भंडारे हे मान्यवर उपस्थित होते.
एन एस एस चे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रमोद शेटे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानामध्ये गट विकास अधिकारी राऊन यांनी विद्यार्थ्यांना जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत होत असलेल्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक क्षेत्रात होणाऱ्या वेगवान बदलांची माहिती देत या बदलत्या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून आपल्यातील क्षमता आणि त्या क्षेत्रातील संधी यांचा अभ्यास करून स्वतःला सिद्ध केले तरच ग्रामीण विकास किंबहुना राष्ट्रनिर्माण कार्याचे उद्दिष्ट साध्य होवू शकेल असे प्रतिपादन करून विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
या प्रसंगी अमृता आरणे, सुप्रिया पवार, राम गोडगे, दिपाली राऊत या विद्यार्थ्यांनी श्री राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जावेद मुलाणी याने केले. प्रास्ताविक अर्पिता गायकवाड हिने केले तर विद्या गावडे हिने आभार प्रदर्शन केले.