करमाळा शहरातील पोस्ट ऑफिस जनशक्ती शेतकरी संघटनेच्या ताब्यात

महिला शेतकरी च्या ठेवीचे पैसे मुदतीत परत न दिल्यामुळे अतुल खूपसे यांचा कार्यकर्त्यासह पोस्ट ऑफिस मध्ये ठिय्या

माढा आणि करमाळा तालुक्याचे प्रमुख शेलार यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे अतुल खूपसे यांनी चार तास पोस्टातील अधिकारी आणि यांना धारेवर धरत ही या मांडला मुदतीच्या आत ठेव मोडताच येत नाही या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यावर खूपसे पाटील आक्रमक होत कायद्याची भाषा शिकू नका जिल्ह्यातील सर्व पोस्ट ऑफिस समोर आंदोलन करू आणि शेतकऱ्यांना जागृत करू की पोस्टात पैसा ठेवू नका ज्या पोस्टाला प्रामाणिक समजलं जातं अशा पोस्टावर महिला शेतकऱ्यांचे पाच पाच लाख एक वर्ष होऊनही मिळत नसतील मिळत नसतील तर मेल्यानंतर मिळणार आहेत का असा जाब विचारत चार तास अधिकाऱ्यांना वेठीस धरल्यानंतर माढा आणि करमाळा तालुक्याचे डाक विभाग प्रमुख शेलार यांनी पंधरा दिवसात पैसे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले

सर्वसामान्य जनतेचा आत्मा म्हणून ओळखणाऱ्या पोस्टाच्या कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल…
बोरगाव येथील रहिवाशी सौ वर्षा हरिभाऊ ढवळे यांनी बोरगाव पोस्ट ऑफिस मध्ये 5लाख रुपयाची ठेव ठेवली होती गेल्या दीड वर्षा पूर्वी त्यांना ठेव ठेव ठेवताना बोरगाव पोस्ट मास्तर परमेश्वर भोगल यांनी त्यांना सांगितले कि ठेव एक वर्षानंतर मोडता येईल त्यानंतर सौ ढवळे या त्यांना गरज लागल्यानंतर बोरगाव पोस्ट मास्तर यांना मला घर बांधकाम करण्यासाठी ठेव मोडायची आहे असे विचारांना केली असता त्यावर पोस्ट मास्तर परमेश्वर भोगल स्पष्ट संगितले कि तुमची ठेव पाच वर्षापर्यत मोडता येणार नाही असे सांगितले नंतर गेल्या दोन महिन्यापासून सौ ढवळे यां करमाळा पोस्ट ऑफिस येथे चकरा मारत असून पोस्ट अधिकारी उडवाडची उत्तरे देऊन वेळ काढू पणा करत असून त्या मानसिक तणावत असून शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी ही माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे पाटिल यांना दिली असता त्यांनी तात्काळ पोस्ट ऑफिस करमाळा येथे धाव घेऊन वरिष्ठ अधिकारी शेलार यांना घेरून जाब विचारला असता त्यांची तारांबळ उडाली यानंतर 15दिवसात ठेव सौ ढवळे यांना न मिळाल्यास जनशक्ती संघटनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा अतुल खुपसे पाटिल यांनी दिला यावळी संघटनेचे पदाधिकारी अतुल राऊत, शरद यकाड, हरिभाऊ ढवळे उपस्थित होते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *