करमाळा प्रतिनिधी
नारायण (आबा) पाटील हे कर्तव्यदक्ष आमदार असुन आदिनाथ कारखान्यास निधी मिळवण्यात त्यांना यश येईल अशी खात्री सोलापूर जिल्हा दूध संघाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रसिंह राजेभोसले यांनी दिली. वीट येथील सभेत ते बोलत होते. श्री आदिनाथ कारखाना संजिवनी पॅनल’च्या प्रचारसभेचे वीट येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तात्यासाहेब जाधव हे होते तर व्यासपीठावर आमदार नारायण आबा पाटील, सोलापूर जिल्हा दूध संघाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रसिंह राजेभोसले, युवानेते सुनील बापू सावंत, सभापती अतुलभाऊ पाटील, माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, माजी सभापती शेखर गाडे, दिगंबर गाडे, जि.प. सदस्य बिभिषण आवटे, चिखलठाणचे सरपंच विकास गलांडे, मा. सरपंच अभयसिंह राजेभोसले, सतिष निंबाळकर, राहूल गोडगे, इन्नूस सय्यद, कैलास बोंद्रे, शाबुद्दीन सय्यद, बाळासाहेब गाडे, सुभाष जाधव, केशव चोपडे, गणेश जाधव, रघुनाथ ढेरे, बाबासाहेब ढेरे, प्रल्हाद जाधव, हनुमंत जाधव, संजय ढेरे, हरी आवटे, चेअरमन हणुमंत ढेरे, जगदीश निंबाळकर, अशोक राऊत, अंकुश जाधव, जोतीराम राऊत, दिगंबर राऊत -माजी सरपंच, विशाल गणगे, गणेश ढेरे, विनोद गरड, संतोष ढेरे, डॉक्टर भागवत ढेरे, श्रीकांत जाधव,गणगे महाराज आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजेंद्रसिंह राजेभोसले म्हणाले की, आदिनाथ मध्ये पाठीमागे कोणी काय केले याची चर्चा आता करुन उपयोग नाही. मी दुध संघात काम केले आहे. सांडलेल्या दूधा बद्दल जादा न बोलता रामकृष्ण हरी म्हणुन ते सोडून द्यायचे तसेच आदिनाथ कारखान्याच्या पाठीमागील कारभारा बद्दल न बोलता मी आदिनाथच्या भविष्या बद्दल बोलणे उचित समजतो. आमदार नारायण आबा पाटील यांचे देशाचे नेते शरदचंद्र पवार यांचे बरोबर चांगले संबंध आहेतच तसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी सुध्दा चांगले संबध आहेत. जोडीला माजी आमदार जयवंतराव जगताप, खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचेही वरीष्ठ पातळीवरील नेत्यांशी चांगले संबंध असल्याने आदिनाथ कारखान्यास उर्जीत अवस्थेत आणण्यासाठी निधीची चिंता सभासदांनी करु नये. वीट गाव एकमुखी आमदार नारायण आबा पाटील व आदिनाथ कारखाना संजिवनी पॅनल’च्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची खात्री राजेंद्रसिंह राजेभोसले यांनी बोलून दाखवली.