करमाळा प्रतिनिधी

आदिनाथ कारखाना हा सहकारी तत्वावर चालणारा कारखाना असुन खाजगी कारखान्यातील व्यक्तीना सहकारचा आत्मा ओळखता येणार नाही असे प्रतिपादन आमदार नारायण (आबा) पाटील यांनी एका प्रचारसभेत केले. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, देशभक्त नामदेवराव जगताप व कर्मयोगी गोविंद बापु पाटील यांच्या प्रेरणेतून श्री आदिनाथ कारखाना संजिवनी पॅनल’च्या प्रचाराची सभा करंजे ता. करमाळा येथे पार पडली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच दादासाहेब सरडे होते तर यावेळी व्यासपीठावर कृषीभूषण नामदेवराव साबळे, सभापती अतुलभाऊ पाटील, अंकुश शिंदे सरपंच पोथरे, विठ्ठल शिंदे, बाप्पा आतकरे, दत्ता डौले, नवनाथ कापले, पांडूरंग हाके, अशोक घरबुडवे, बलभिम पवार, जयद्रत बापू शिंदे, श्रीराम सुखसे मिरगव्हणचे सरपंच, बाळासाहेब सरडे सरपंच करंजे-भालेवाडी ग्रुप ग्रामपंचायत, युवराज जाधव, बलभिम पवार सर, भिमराव फुके, राघू उबाळे, विशाल पवार मेजर, विलासदादा पवार, डॉ.पांडूरंग हजारे, एकनाथ हजारे, लक्ष्मण लांडगे, राजाभाऊ सरडे, गौंडरे माजी सरपंच आजिनाथ सपकाळ, सोमनाथ तरंगे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की, आदिनाथ कारखाना हा भाडेतत्त्वावर देत असताना सभासदांचा हक्क हिरावून घेतला जाईल असे लक्षात आल्यानंतर मी यास पुर्ण ताकदीने विरोध केला. आदिनाथ कारखान्याच्या प्रत्येक गोष्टीत सभासदांचा हक्क आहे. सभासदांच्या मालकी हक्काची ही संपत्ती आहे. यामुळे जर गटातटाचे राजकारण आजही चालू ठेवले तर आदिनाथ आणखी तोट्यात येईल. मी सभासदांना विनती करतोय की तुम्ही तुमचे कारखान्यावरील हक्क अबाधित रहावा म्हणून आमच्या तुमच्या या श्री आदिनाथ कारखाना संजिवनी पॅनलला निवडुण द्या. जुन्या जाणत्या माणसांच्या त्यागाची उतराई करण्याची हिच खरी वेळ आहे. या कारखान्याच्या उर्जित अवस्थेत आणण्यासाठी निधी कसा उपलब्ध करायचा ही जबाबदारी माझ्यावर सोपवा, तुम्ही चिंता करु नका. एक आमदार म्हणुन मी कुठेही कमी पडणार नसल्याचे अभिवचन आमदार नारायण आबा पाटील यांनी सभासदांना दिले.यावेळी सभापती अतुल पाटील, बाजार समिती संचालक देवानंद बागल, डॉ. अमोल घाडगे, पं.स. सदस्य विधीज्ञ राहुल सावंत, अंकुश शिंदे, आदिनी विचार मांडले. प्रास्ताविक आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले तर आभार भाऊसाहेब फुके यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निवेदक प्रा. समाधान कोळेकर यांनी केले. या सभेस कंरंजे, भालेवाडी, करमाळा, गौंडरे, निमगाव, कोळगाव आदि गावातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *