
करमाळा प्रतिनिधी
मराठी नववर्ष अर्थातच गुढीपाडवा निमित्त ग्रामपंचायत शेलगाव क च्या पुढाकारातून 30 मार्च रोजी सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या शेलगाव क कृषी क्रांती गटाचा सत्कार तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या नागरिकांचा सत्कार समारंभ “सन्मान गावाचा सत्कार शिलेदारांचा” या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून गणेश भाऊ करे-पाटील (अध्यक्ष यशकल्याणी सेवाभावी संस्था), सरपंच यमुना वीर, उपसरपंच लखन ढावरे, माजी सरपंच अशोक काटुळे, माजी सरपंच आत्माराम वीर, माजी उपसरपंच सचिन पाटील, सत्कारमूर्ती प्रा.प्रकाश काटुळे, ग्रामसेवक महेश काळे आदी उपस्थित होते. यावेळी तलवारबाजी खेळाच्या माध्यमातून ठसा उमटविणारे प्रा.प्रकाश काटुळे, शेलगाव क गावामध्ये ग्रामस्वच्छता, जलसंधारण व वृक्ष संवर्धनाची चळवळ रुजविणारे ग्रामसेवक महेश काळे व फार्मर कप स्पर्धेमध्ये उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल शेलगाव क कृषी क्रांती गटाचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एसटीआय, कृषी अधिकारी पद मिळविणारे तसेच वकील, प्राध्यापक, शिक्षक, हवालदार, केंद्रीय सुरक्षा बल, भारतीय रेल्वे इत्यादी विभागांमध्ये सेवा करणारे तसेच इंजीनियरिंग, डॉक्टर यासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी, शिष्यवृत्ती तसेच क्रीडा स्पर्धेमध्ये उल्लेखनीय काम केलेले विद्यार्थी यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सायली पायघन, स्वप्नील वीर, समृद्धी वीर, डॉ.नागनाथ माने, शुभम वीर, ऍड.राहुल बनसोडे, ऍड.विशाल वीर, प्रविण वीर, राहुल वीर, विशाल वीर, अभय काटुळे, सुजित काटुळे, सचिन जगताप, विक्रांत वीर, उमेश वीर, महेश वीर, समाधान घाडगे, पांडुरंग घाडगे, उदयसिंह वीर, महेश वीर, तन्मय काटुळे, कौस्तुभ काटुळे, पूजा काटुळे, तेजस काटुळे, मयूर शिंदे, श्रेयस काटुळे, केदार पाटील, संग्रामसिंह पायघन, रोहित वीर, प्रथमेश वीर, गौरव वीर, निखिल काटुळे, वैष्णवी शिंदे, ऋतुजा शिंदे, प्रणव वीर, अक्षय वीर, सार्थक वीर, व्यंकटेश काटुळे, ओम काटुळे, नवता वीर, राजकन्या पाटील, मृणाली शिंदे, ज्ञानेश्वरी चोपडे, संस्कार शिंदे, सारंगी पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी रोहिणी वीर, गंगा काटुळे, अशोक काटुळे, प्रकाश काटुळे, महेश काळे, पोपट शिंदे, सायली पायघन यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विकास वीर यांनी केले. अध्यक्षीय मार्गदर्शन गणेश भाऊ करे पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदयसिंह काटुळे यांनी केले तर आभार ग्रामसेवक खाडे यांनी मानले.