
पाणी टंचाई बाबत प्रशासकीय स्तरावरुन आताच योग्य ते नियोजन करा – आमदार नारायण आबा पाटील
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाई बाबत प्रशासकीय स्तरावरुन आताच योग्य ते नियोजन करा अशी सुचना विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी केली. करमाळा येथील संभाव्य पाणी टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. करमाळा तालुक्यातील नागरिकांना आगामी काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागु नये म्हणून आमदार नारायण आबा पाटील यांनी एका संभाव्य पाणी टंचाई बैठकीचे आयोजन करण्याचे सुचित केले .त्यानूसार आज करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात बैठक संपन्न झाली. याबैठकीस तहसिलदार शिल्पा ठोकडे, सभापती अतुल पाटील, सदस्य राहुल सावंत, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष वारे, राजाभाऊ कदम, बाजार समिती संचालक देवानंद. बागल, प्राचार्य जयप्रकाश बिले, विकास गलांडे, प्रा अर्जुनराव सरक उपस्थित होते. यावेळी तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी गतसालच्या पाणी टंचाईचा आधार घेऊन प्राप्त अहवालानुसार तालुक्यातील सद्यस्थिती बाबत माहिती मांडली. तसेच या बैठकीत माहिती देताना संबंधित विभागप्रमुखांना योग्य ती माहिती प्रत्यक्षात जमिनस्तरावरअथवा गावभेटी करुन घ्यावी आणि दहा दिवसाच्या आत योग्य वअचुक अहवाल सादर करावा असे आदेश दिले. तर आमदार नारायण आबा पाटील यांनी पाणी पुरवठा विभागाने दक्ष राहून उद्याच्या पाणी टंचावर मात करण्यासाठी आताच योग्य कार्यक्रम हाती घ्यावा. आमदार म्हणुन आपणास हवे ते सहकार्य केले जाईल पण यातुन जनतेच्या प्रश्नांची हेळसांड झाली नाही पाहिजे. जलजीवन योजनांच्या बाबतीत सर्व माहिती घेऊन एका समितीद्वारे प्रत्यक्षात कार्यस्थळावर जाऊन पाहणी केली जाईल. यात दोषी सापडलेल्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असा इशारा दिला तसेच सर्वच शासकीय विभागातील अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य माणसाला आपल्या कार्यालयात तो काम घेऊन आल्यास त्यास सन्मानाची वागणूक करुन त्याची समस्या जाणून घेतली गेली पाहिजे. सर्वसामान्य माणसाला एकाच कामासाठी हेलपाटे मारायला लावणे अथवा चुकीची माहिती देऊन त्याच्या कामाची अडवणुक करण्याचे प्रकार किमान माझ्या आमदार पदाच्या कार्यकाळात तरी खपवून घेतले जाणार नाहीत असे स्पष केले. या बैठकीत अनेक गावातील सरपंचांनी आपल्या गावातील समस्या आमदार महोदयांच्या समोर मांडल्या. विशेषत महिला सरपंचांनी सुध्दा या आढावा बैठकीत ठामपणे आपल्या गावातील समस्या मांडल्या. या बैठकीस महसुल, पाणीपुरवठा उपअभियंता श्री. निहाल शेख, महावितरणचे कलावते, कुकडी डावा कालवा, पाटबंधारे, पंचायत समिती आदि विभागातील प्रमुख अधिकाऱ्यासह ग्रामसेवक , विस्तार अधिकारी, ग्राम महसुलअधिकारी आदि उपस्थित होते.
