मंगळवारी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर…
प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार मंगळवार दि. 24 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते तालुक्यातील विकास कामांचे भूमिपूजन तसेच तसेच महिला व शेतकरी मेळाव्याला संबोधित करतील. सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने झरे फाटा येथील राधेश्याम मंगल कार्यालय येथे उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भरत अवताडे यांनी केले आहे.


याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, अजितदादा पवार साहेब यांचे सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे हेलिकॉप्टरने आगमन होईल .त्यानंतर करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत कमलाभवानी यांचे दर्शन घेऊन महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ते झरे फाटा येथील नियोजित मेळाव्यासाठी जातील.जाताना सुभाष चौक, देवळाली येथे त्यांचे स्वागत होईल.
झरे फाटा येथे सावडी जिल्हा हद्द ते वेणेगाव या 71 किलोमीटर लांब असलेल्या व 271.55 कोटी निधी मंजूर असलेल्या रस्त्याचे भूमिपूजन ना.अजितदादा पवार यांचे शुभहस्ते होईल.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सोलापूरचे पालकमंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील हे असतील तर प्रमुख उपस्थितीमध्ये माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे ,करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप हे असतील .झरे फाटा येथील कार्यक्रमात लाडकी बहीण व शेतकरी मेळावा यांना अजितदादा मार्गदर्शन करतील त्यानंतर महायुतीतील घटक पक्षाची बैठक ना. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये होईल आणि त्यानंतर दौऱ्याची सांगता होईल.


सदर दौऱ्यासाठी देवीचा माळ येथून बाईक रॅलीचे आयोजन केले असून तालुक्यातील आमदार संजयमामा शिंदे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व तरुणांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या मोटरसायकलीसह देवीचामाळ येथे उपस्थित रहावे. महिलांनी झरे येथील कार्यक्रमाचे ठिकाणी यावे असे आवाहन भरतभाऊ अवताडे यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *