
सोलापूर दि.29 (जिमाका):- राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
गुरुवार दि. 30 जानेवारी रोजी सकाळी 8.45 वाजता पुणे येथून विमानाने सोलापूरकडे प्रयाण. सकाळी 09.45 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन व नवीन जिल्हाधिकारी कार्यालय कडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व जिल्हा नियोजन समिती बैठकीस उपस्थिती. दुपारी 01.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून सोलापूर विमानतळ कडे प्रयाण व दुपारी 01.15 वाजता सोलापूर येथून विमानाने पुणे कडे प्रयाण करतील.

