करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचे जेष्ठ नेते, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन, सर्पदंश झालेल्या हजारो लोकांना जीवदान देणारे लोकप्रिय प्रसिद्ध डॉ.प्रदिपकुमार जाधव-पाटील (आबा) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. आज मौजे तरटगाव येथे आदिनाथचे माजी चेअरमन संतोष जाधव-पाटील, उपसरपंच अभिजित जाधव पाटील, डॉ. रोहन जाधव पाटील, अजिंक्य जाधव पाटील आदी कुटुंबीयांची आमदार संजयमामा शिंदे यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ता.अध्यक्ष भरत अवताडे, मांगी वि.विकास सोसायटीचे चेअरमन सुजित बागल, देवळालीचे माजी सरपंच अशिष गायकवाड, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष आशपाक जमादार, मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष नानासाहेब मोरे, तरटगावचे युवक नेते तात्यासाहेब पाटील, देवळालीचे पोपट बोराडे, स्वीय सहाय्यक प्रविण शिंदे गुरुजी व ग्रामस्थ उपस्थित होते.