करमाळा प्रतिनिधी
किल्ला विभाग येथे मानाचा तिसरा गणपती लोकमान्य टिळक तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवा निमित्त मोफत नेत्रतपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदर शिबिराचे उद्घाटन डॉ. निलेश मोटे यांच्या हस्ते व यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. सदर शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला असून ५७३ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतलेला असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सागर गायकवाड यांनी दिली. शिबिरासाठी लागणारी सुसज्ज अशी संपूर्ण यंत्रणा मंडळाच्या वतीने उपलब्ध करण्यात आली होती. तसेच शिबिरास्थळी येणाऱ्या नागरिकाना मंडळातील सदस्यांच्या वतीने यथायोग्य सहकार्य करण्यात येत असल्याने नागरिकामधून समाधान व्यक्त केले जात होते.
सदर शिबिरासाठी मंडळातील उपाध्यक्ष अनिकेत चोरगे, सचिव गणेश शिंदे, खजिनदार अभिजीत कारंडे, मिरवणूक प्रमुख वासुदेव ढोके, कार्याध्यक्ष भोलेनाथ ननवरे, गणेश पवार, कमलेश तोडकर, शिवराज तोडकर, योगेश जोशी, शुभम ननवरे यांचे सह सर्व सदस्य उपस्थित होते.