करमाळा प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे यांनी जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा VJNT सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज जाहीर केल्या. यामध्ये पुनवरचे उपसरपंच सुनील जाधव यांची भाजपा VJNT सेलच्या तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. नूतन तालुकाध्यक्ष सुनील जाधव यांनी आपली कार्यकारिणी घोषित केली. नूतन VJNT कार्यकारणी मध्ये तालुका सरचिटणीस पदी कविटगावचे सुरज भानुदास कुसेकर यांची तर तालुका उपाध्यक्ष म्हणून श्याम रमेश माने (करमाळा), तालुका चिटणीस पदी नितीन हनुमंत ननवरे (हिसरे) व बाबुराव भीमराव सुरवसे (मांगी) यांची निवड करण्यात आली.
या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी अभिनंदन केले. तालुका अध्यक्ष रामभाऊ ढाणे यांनी भारतीय जनता पार्टीची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी जनतेशी संपर्क करावा असे आवाहन केले.
यावेळी ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश ननवरे, जिल्हा चिटणीस विनोद महानवर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल पवार, आजिनाथ कोळेकर वस्ताद, सोमनाथ घाडगे, भैय्याराज गोसावी, किरण शिंदे, हर्षद गाडे, अतुल इंदुरे, संजय किरवे, सागर सरडे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.