करमाळा प्रतिनिधी
आ. शिंदे यांच्यामुळे लिंबेवाडी येथील स्मशानभूमीचा प्रश्न सुटला असल्याची माहिती लिंबेवाडीचे सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किरण फुंदे यांनी दिली आहे.आमदार संजयमामा शिंदे यांच्यामुळे आज
लिंबेवाडी येथील देश स्वातंत्र्य पासुनचा स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित होता तो सुटला आहे यासंदर्भात आम्ही आ. संजयमामा शिंदे यांना सांगितले होते की गेले कित्येक वर्षे गावातील नागरिक अंत्यसंस्कार आपल्या रानात करीत होते याची त्वरित दखल घेत आ शिंदे यांनी हा प्रश्न मार्गी लावला आहे संरपच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांच्यावतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा लिंबेवाडी यांनी आ. संजयमामा शिंदे यांचे आभार मानले आहे.