करमाळा प्रतिनिधी
विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात दौऱ्यावर असताना ग्रामीण भागातील जनतेच्या भेटी घेत असताना आज सावडी गावाला भेट दिली असता ग्रामस्थांनी सत्कार करून अत्यंत मनमोकळेपणाने संवाद केला. ग्रामीण भाग म्हटलं शेतकरी जास्त संख्येने भेटतात. आज
सावडी गावात ग्रामस्थांशी चर्चा करत असताना मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. ग्रामीण भागात दौऱ्यावर असताना काही गोष्टी लक्षात आल्या त्या म्हणजे शेतकऱ्यांच्या सरकारकडुन अपेक्षा या मर्यादितचं असतात.अवाजवी मागणी त्यांची कधीचं नसते जे हक्काचं आहे ते मिळावं,वेळेवर मिळावं आणि योजनांचा लाभ घेताना प्रक्रिया सोपी असावी बाकी जास्त कुठल्याच अपेक्षा नसतात. आज सावडी गावातील
ग्रामस्थांनीही अशाच काही सुचना केल्या आहेत नक्कीच त्या सरकारी यंत्रणेपर्यंत पोहचविण्याचं काम करण्याचं आश्वासन त्यांना दिलं. करमाळा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात गावभेटी घेत असताना मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला महायुती सरकारच्या कामाची, योजनांची माहीती देण्याबरोबरचं,जनतेच्या अडचणी महायुती सरकारच्या प्रमुख नेत्यापर्यंत पोहचविण्याचं काम करून त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
यावेळी उपस्थित ग्रामस्थ सरपंच भाऊसाहेब शेळके, पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब जाधव, समाधान जाधव, शिवाजी जाधव, लक्ष्मण जाधव, माजी सरपंच भैय्या देशमुख, नामदेव जाधव, आदिनाथ जाधव, दादा गोडसे, आप्पा जाधव, विठ्ठल जाधव, विश्वहिंदु परिषदेचे नेते संतोष वाळुंजकर, भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्र ठाकुर, भाजपा नेते सुजित क्षिरसागर व ईतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.