दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे- संचालक राजेंद्रसिंहराजे भोसले
करमाळा प्रतिनिधी
शासन दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देत नाही आवश्यक असे सहकार्य करीत नाही यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे अशी खंत दूध संघाचे संचालक राजेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.
दुधाचा सत्तावीस रुपये दर पाच रुपये अनुदान शासनाने जाहीर केली परंतु अजून अनुदान काही दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेली नाही जनावरांना टँगिंग करा, ऑनलाईन लिंक करा ती लवकर होत नाही, पशुखाद्याचे दर वाढले आहे असे अनेक समस्या शेतकऱ्यांना जाणवत आहे दर 33 किंवा 34 रूपये हवा आहे याचा विचार शासनाने करावा अन्यथा शेतकऱ्यांनी लोकसभेला जसा धडा शिकविला आहे त्याप्रमाणे आगामी विधानसभेला या सत्ताधारी मंडळींना शेतकरी त्यांची जागा दाखवेल असेही अखेर दूध संघाचे संचालक राजेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले आहे.